करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:47 PM2021-09-18T16:47:09+5:302021-09-18T16:48:57+5:30

करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

Hearing on Karuna Sharma's bail application on Monday | करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Next

अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा ( karuna Sharma ) यांचा कोठडीतील मुक्काम सोमवारपर्यंत वाढला आहे. शनिवारी (दि.१८) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यालायासमोर झाला असून सोमवारी त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे. 

परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. शनिवारी न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Hearing on Karuna Sharma's bail application on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app