मुख्याध्यापकांनी शैक्षणिक कामे जबाबदारीने करावीत : नवनाथ सोनवणे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:34+5:302021-03-18T04:33:34+5:30
पहिल्या सत्रात नयुम शेख व गिरी यांनी स्वाधाय उपक्रम, विषय कसे निवडायचे, आधार नोंदणी कशी करावयाची, टेस्ट कशी सोडवायची, ...

मुख्याध्यापकांनी शैक्षणिक कामे जबाबदारीने करावीत : नवनाथ सोनवणे - A
पहिल्या सत्रात नयुम शेख व गिरी यांनी स्वाधाय उपक्रम, विषय कसे निवडायचे, आधार नोंदणी कशी करावयाची, टेस्ट कशी सोडवायची, या विषयावर मार्गदर्शन करताना सर्व संगणकीय कामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ सोनवणे यांनी मुख्याध्यापकांनी शैक्षणिक कामकाज व त्याचा सविस्तर विस्तार कशा पद्धतीने करावयाचा, हे सांगितले. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले आदेशित सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सक्त आदेश दिले. केंद्रीय मुख्याधापक श्रीराम चाटे, राजाभाऊ कदम, श्रीराम देशमुख, गोकुळ सारूकसह सर्व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
160321\311720210316_151316_14.jpg
===Caption===
१६ मार्च रोजी केज तालुक्यातील केंद्र लव्हुरी येथे केंद्रातील सर्व मुख्याधापकांची बैठक आयोजित करण्यात आले होते.