विवाहितेला पळवून पुण्यात नेले, परतताच कोरोनाने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:47 IST2020-07-16T19:46:26+5:302020-07-16T19:47:28+5:30

पीडितेसह पोलिसांचा घेणार स्वॅब

He took the married woman to Pune and on his return he was Corona Positive | विवाहितेला पळवून पुण्यात नेले, परतताच कोरोनाने गाठले

विवाहितेला पळवून पुण्यात नेले, परतताच कोरोनाने गाठले

ठळक मुद्दे बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोनाबाधित माजलगाव तालुक्यात खळबळ

माजलगाव : चार मुलांची आई असलेल्या महिलेस पळवून नेत पुणे गाठले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. नंतर परत येताच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. स्वॅब घेऊन बीडच्या क्वारंटाईन कारागृहात पाठविले. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. माजलगाव ग्रामीण ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याने त्यांचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत.

माजलगाव तालुक्यातील एका गावातील मुलांचा बाप असलेल्या २६ वर्षीय व्यक्तीने चार मुलांची आई असलेल्या ३० वर्षीय महिलेला १७ जुन रोजी पुणे येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ८ जुलै रोजी तो परत आला. ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेने त्याच्याविरोधात अत्याचाराची फिर्याद दिली.  ९ जुलै रोजी त्याची वैद्यकीय तपासणी करून दोन वेळा न्यायालयात हजर केले. एकवेळा पोलीस कोठडी तर दुसऱ्या वेळेस त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याचा स्वॅब घेऊन त्याला कारागृहात पाठविण्यात आले. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सर्वत्र खळबळ उडाली.

पीडितेसह पोलिसांचा घेणार स्वॅब
आरोपीच्या संपर्कात पीडिता व काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी आहेत. पीडितेचा स्वॅब घेतल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले. तर इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांचेही स्वॅब घेण्याच्या हालचाली आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. प्रकरणाची न्यायालयालाही माहिती कळविल्याचे सूत्रांकडून समजते. 

Web Title: He took the married woman to Pune and on his return he was Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.