दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 11:19 IST2021-11-04T11:18:13+5:302021-11-04T11:19:20+5:30

कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला, त्यानंतर परतलाच नाही.

He came home on the occasion of Diwali and kidnapped his uncle's daughter, a crime against his niece | दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा

दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा

माजलगाव (जि.बीड) : कपडे घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेऊन गेलेल्या तरुणाने मामाच्या मुलीला पळवून नेले. ही घटना शहराजवळील एका गावात २४ ऑक्टोबर रोजी घडली. शहर ठाण्यात ३ रोजी भाच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला.

शहराजवळील एका गावात राहणारी १७ वर्षीय मुलगी अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिची आत्या वडवणी तालुक्यात असून तिचा मुलगा २४ ऑक्टोबर रोजी घरी आला. कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला, त्यानंतर परतलाच नाही. त्या दोघांचा थांगपत्ता अजून लागला नाही. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी मुलीच्या आईने शहर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून भाच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास फौजदार अविनाश राठोड करत आहेत.

Web Title: He came home on the occasion of Diwali and kidnapped his uncle's daughter, a crime against his niece