बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:50 IST2019-07-15T18:45:23+5:302019-07-15T18:50:03+5:30

हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते.

Harsh Poddar is now Beed's Police Superintendent; G. Sridhar transfered to Gadchiroli | बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली

बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली

ठळक मुद्देजी.श्रीधर यांची समादेशक पदावर बदली अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची मुंबईला बदली

बीड : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अशा सर्व वरिष्ठ पोलीस
अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी झाल्या. यामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची गडचिरोली येथील भारत राखीव बटालीयन गट  क्र. १३ वडसा देसाईगंज येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षक पदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. येत्या काळात विधानसभा निवडणूक आहे, बीड जिल्हा हा संवेदनशिल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निवडणूका भयमुक्त वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान पोद्दार यांच्यापुढे असणार आहे.

यासोबतच अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली. तर त्यांच्या जागेवर उस्मानाबादच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर पदभार स्वीकारणार आहेत. 

Web Title: Harsh Poddar is now Beed's Police Superintendent; G. Sridhar transfered to Gadchiroli