शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बायकोकडून होतोय छळ, कोरोनाकाळात १४९ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : विवाहित महिलांचा जसा छळ होतो, त्याच प्रकारे विवाहित पुरुषांचा देखील पत्नीकडून छळ होत असल्याच्या घटना वाढत आहेत. ...

बीड : विवाहित महिलांचा जसा छळ होतो, त्याच प्रकारे विवाहित पुरुषांचा देखील पत्नीकडून छळ होत असल्याच्या घटना वाढत आहेत. कोरोना काळात जवळपास १४९ पत्नीपीडित पुरुषांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, समाज काय म्हणेल, या भीतीने अनेक पुरुष पत्नीचा निमूटपणे छळ सहन करत असल्याचे पत्नीपीडितांचे मत आहे.

विवाहित पती-पत्नीमध्ये अनेक कारणांवरून भांडणे होत असतात. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होते. त्यानंतर नातेवाइकांचा सहभाग यात होऊन ही प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात. यातून संसारात कलह निर्माण होऊन संसार तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांवर ‘भरोसा सेल’मध्ये सुनावणी घेऊन दोघांचीही समजूत घालण्यात येते. त्यातून संसार जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून बहुतांश संसार पुन्हा नव्याने सुरू होतात. तर, काही प्रकरणांमध्ये तडजोड होत नाही. त्यातून पत्नी-पतीविरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करते. त्यातून न्यायालयात पोटगीदेखील मागितली जाते.

दरम्यान, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, यातून पती व पत्नीचा कलह वाढला असून, जवळपास १४९ पुरुषांनी पत्नीकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये प्रमुख्यांने आई-वडिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. सतत भांडण करते तर काही प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंध आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.

कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी

कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवासय बंद होते. या काळात दोघेही घरीच असल्यामुळे अनेक कारणांवरून दोघांमध्ये खटके उडत होते. यातून कौटुंबिक वादाला तोंड फुटले. यामध्ये नातेवाईक आल्याने वाद वाढत गेला यातून पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या काळात तक्रारी वाढल्या आहेत.

आर्थिक टंचाई व मोबाइमुळे कौटुंबिक कलह

लॉकडाऊमध्ये नवऱ्याचा व्यवसाय बंद झाला काहींची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली त्यात खर्च कमी करावे लागले. यामुळेदेखील कौटुंबिक वाद झाले.

दोघेही सतत घरी असल्यामुळे मोबाइलवर पती किंवा पत्नी बोलत असेल तर विनाकारण संशय घेऊन दोघांमध्ये वाद झाल्यामुळेदेखील तक्रारी वाढल्या आहेत.

महिला आणि पुरुष एकसमान असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, पत्नीकडून होणाऱ्या छळाला पोलीस प्रशासनाकडून महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे पत्नीपीडितांची परिस्थिती वाईट आहे.

पत्नी पीडित

समाजात पत्नीकडून छळ होत असल्याचे मान्य केले जात नाही. मात्र, अनेक पुरुषांचे पत्नीच्या छळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे कायद्यात याप्रकरणांमध्ये लवकर निर्णय घेण्यासाठी विशेष कायदा करावा

पत्नीपीडित

एकमेकांना समजून घेणे गरजेचे

पती-पत्नी एकसमान आहेत, अनेक कुटुंबात दोघेही कमवते आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. संसार सुखाचा करायचा असल्यास कौटुंबिक कलह नसणे गरजेचे आहे. तसेच सततच्या कौटुंबिक कलहातून आर्थिक स्थितीदेखील बिघडते व कुटुंब उघड्यावर येते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी

२०१८- ८५

२०१९-७८

२०२०-१०६

२०२१ -१४९