चौसाळ्याजवळ २० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:04 IST2019-06-14T00:02:55+5:302019-06-14T00:04:17+5:30
हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला.

चौसाळ्याजवळ २० लाखांचा गुटखा जप्त
बीड : हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अकमल अकबर शेख (२५ रा.उमरगा जि.उस्मानाबाद) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच २५ एजे ११९८) हैदराबादहून मांजरसुंबामार्गे हिंगोलीकडे जात होता. हीच माहिती नव्याने रूजू झालेले सपोनि महेश टाक यांना मिळाली. त्यांनी चौसाळ्याजवळ सापळा लावला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. तपासणी केली असता त्यात गुटखा दिसून आला. तात्काळ हा टेम्पो नेकनूर ठाण्यात आणण्यात आला. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी ठाण्यात जावून सर्व पंचनामा केला. त्यानंतर गुन्हा दाखल केला. हा टेम्पो युनूस इस्माईल मुल्ला (रा.उमरगा जि.उस्मानाबाद) यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. टेम्पोची अंदाजे किंमत १२ लाख रूपये आहे.