केजमध्ये २४ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:40+5:302021-09-04T04:40:40+5:30
केज : येथील पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल २४ लाख ४८ हजारांचा ...

केजमध्ये २४ लाखांचा गुटखा पकडला
केज : येथील पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल २४ लाख ४८ हजारांचा रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, अवैद्य धंदेचालक, गुटखा किंग आणि गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुक्यात सर्वत्र किराणा दुकान, पानटपरी, चहाचे हॉटेल आदी ठिकाणी गुटख्याची सर्रासपणे विक्री चालू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांना मिळताच त्यांनी विशेष पथकाला कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार विषेश पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाणे हद्दीत क्रांतिनगर भागात, वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोदामावर छापा मारण्यात आला. त्यात १७ लाख ४६ हजार २२० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळल्याप्रकरणी पप्पू कदमविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या धाडीनंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाणे हद्दीतील, खुरेशी मोहल्ला, दर्गा रोड, केज येथील गोदामावर छापा टाकला. त्यात ७ लाख २ हजार ८६० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. याप्रकरणी अबुजर खैरउमिया खुरेशीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.