रूई येथे मोसंबी लागवड व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:10+5:302021-07-02T04:23:10+5:30
गेवराई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील रुई येथील प्रकल्पांतर्गत कृषी विद्यावेत्ता मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे ...

रूई येथे मोसंबी लागवड व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
गेवराई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील रुई येथील प्रकल्पांतर्गत कृषी विद्यावेत्ता मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मोसंबी लागवड आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच शेततळे व रेशीम लाभार्थी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चौकी सेंटर तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
जिल्हांतर्गत क्षेत्रीय भेटी अंतर्गत या कार्यक्रमात वृक्ष लागवडीचे महत्व सांगून जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यातून बांबूपासून कुटीर उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. प्रकल्पांतर्गत शेडनेट पॉलिहाऊसचे जास्तीत जास्त लाभ घेऊन दर्जेदार मालाचे उत्पादन करून तो माल उत्पादक ते ग्राहक अशी सेवा दिल्यानंतर निश्चितच विक्रेता व उपयुक्तता या दोघांनाही फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विहीर पुनर्भरणाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जलव्यवस्थापन करून ठिबक व तुषारचा अवलंब करावा व कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा, असे यावेळी कोळेकर म्हणाले. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व सहायकांनी पोकरा योजनेअंतर्गत असणारे सर्व ॲप व्यवस्थित वापरून शेतकऱ्यांपर्यंत हवामान सल्ला देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संवाद विशेषज्ञ संग्राम जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी मडके, तालुका कृषी अधिकारी बी.टी सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी मस्के ,जगधने जयशिव, घसिंग, पवार, जाधव, पी. जी. पवार, के. के. पवार, के. एस. सुतार, आर. के. म्हेत्रे, डी. आर. राठोड, एस. बी. शिंदे, पी. एन. मुने, रुईचे सरपंच शिवाजी काजळे, कालिदास नवले, अंगद नवले सह शेतकरी उपस्थित होते.
डीबीटीमुळे शेतकरी समाधानी
रूई येथील कार्यक्रमानंतर गेवराई येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कृषी सहायक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. डीबीटी ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात येत असून ग्रामस्तरावरील शेतकरी समाधानी असल्याचे कोळेकर म्हणाले.