शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीच्या कोविड हॉस्पिटलला रुग्णांचा मोठा ताण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

८ डॉक्टरांच्या रिक्त पदांकडेही महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या ...

८ डॉक्टरांच्या रिक्त पदांकडेही महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला कोविडच्या सामान्य रुग्णांचा मोठा ताण जाणवत आहे. कोविडची रुग्ण सेवा सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागात रिक्त असणाऱ्या डॉक्टरांच्या आठ जागा भरण्याच्या प्रक्रियेकडेही महाविद्यालयाचे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा होत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या कोविडला प्रतिबंध करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालयासोबतच लोखंडी सावरगाव येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. यासोबतच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल) सुरू करण्यात आले. अतिअस्वस्थ कोविड रुग्णांवरच स्वारातीच्या डीसीएचमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात यावेत व इतर ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सामान्य रुग्णांवर सार्वजनिक आरोग्य विभागाने उपचार करावेत असे स्पष्ट निर्देश शासनाने यावेळी दिले होते. मात्र, हे सर्व संकेत बाजूला ठेवत स्वारातीच्या डीसीएच कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर मेडिसीन विभागाचे सर्व डॉक्टर्स आजपर्यंत उपचार करीत आहेत.

रुग्ण सेवेचा ताण..!

स्वारातीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी ही पूर्णतः मेडिसीन विभागाकडे आहे. मेडिसीन विभागाकडे यापूर्वीच बाह्यरुग्ण विभाग, पुरुष विभागाचे २ वॉर्ड, महिला रुग्णांचे २ वॉर्ड आणि अतीदक्षता विभाग या पाच आंतररुग्ण कक्षातील रुग्ण आणि कॅज्युअलटीतून येणारे कॉल यामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या शुश्रूषेची जबाबदारी आहे. कोविडच्या या नव्या संसर्गामुळे आता पाच नव्या आंतररुग्ण कक्षाची वाढ झाली आहे. आणि या पाचही आंतररुग्ण कक्षात कोविडची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

डॉक्टरांची मोठी कमतरता; प्रशासनाचे दुर्लक्ष

स्वारातीच्या डीसीएच कोविड सेंटरमध्ये आज जवळपास ८० रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्तचा रुग्णसेवेचा ताण वेगळाच आहे. त्यातही रुग्णसेवेचा हा ताण सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागात गेल्या अनेक दिवसांपासून ४ लेक्चरर आणि ४ एसआरच्या अशा एकूण ८ जागा रिक्त आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि क्षमतेपेक्षा कमी डॉक्टर या सर्वांचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. असे असताना मेडिसीन विभागांतील ८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

भूलशास्त्र व इतर विभागांतील डॉक्टर कोविडकडे वळवा

गेल्या वर्षी कोविड रुग्णसंख्या वाढली असता मेडिसीन विभागातील डॉक्टरांचा रुग्णसेवेचा वाढत जाणारा ताण कमी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी भूलशास्त्र विभागातील डॉक्टरांकडे कोविड वॉर्डाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मदतीला मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्षाच्या बॉण्डवर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यांना नियुक्त केले होते. आज कोविडची रुग्ण संख्या वाढत असताना विद्यमान अधिष्ठाता यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसत नाही.

जळगाव येथील प्रतिनियुक्तीचा घाट कशासाठी ?

या संदर्भात स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की राज्यात जिथे रुग्णांची संख्या वाढते तिथे मुंबई येथूनच प्रतिनियुक्त्या दिल्या जातात. ठरावीक कालावधीसाठी हे डॉक्टर प्रतिनियुक्त्यावर आहेत.