गुड न्यूज! बीडसाठी 'गेम चेंजर' ठरणारा टाटांचा CIIIT प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:27 IST2026-04-08T18:24:50+5:302026-04-08T18:27:10+5:30

बीड एमआयडीसीत टाटा टेक्नॉलॉजीसचे हायटेक केंद्र; दरवर्षी ७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार तांत्रिक प्रशिक्षण

Good News! Tata's CIIIT project, which will be a 'game changer' for Beed, will be completed by August 15 | गुड न्यूज! बीडसाठी 'गेम चेंजर' ठरणारा टाटांचा CIIIT प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

गुड न्यूज! बीडसाठी 'गेम चेंजर' ठरणारा टाटांचा CIIIT प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण आणि थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या 'सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्यूबेशन अँड ट्रेनिंग' (सीट्रीपलआयटी) प्रकल्पाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. एप्रिल २०२६ पासून या केंद्राच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली असून, येत्या १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. तसेच मे महिन्यात प्रशिक्षण केंद्र तयार होणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारला जात आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि मोठी गुंतवणूक
बीड एमआयडीसी मधील 'एएम-३' या ४००० स्क्वेअर फूट जागेवर हा हायटेक प्रकल्प उभा राहत आहे. या केंद्रासाठी एकूण १९६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा ३१ कोटी रुपयांचा वाटा असून, जागतिक कीर्तीची 'टाटा टेक्नॉलॉजीस' कंपनी तब्बल १६५ कोटी रुपयांचा मोठा निधी तंत्रज्ञान आणि साहित्यासाठी उपलब्ध करून देत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व अत्याधुनिक तांत्रिक साहित्य टाटा टेक्नॉलॉजीस, पुणे यांच्याकडून डिसेंबर २०२५ मध्येच प्राप्त झाले आहे.

तरुणांसाठी रोजगाराची नवी पहाट
या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी ७ हजार प्रशिक्षणार्थींना विविध प्रगत क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. उद्योगांच्या आजच्या गरजा ओळखून हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने, कोर्स पूर्ण होताच तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. टाटा टेक्नॉलॉजीसच्या नियोजनानुसार, मे २०२६ पर्यंत प्रशिक्षण हॉलचे काम पूर्ण होईल. आगामी शैक्षणिक वर्षात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टाटा टेक्नॉलॉजीसमध्ये समन्वय सुरू आहे.

प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम
या केंद्रातील अभ्यासक्रमांची माहिती तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, कौशल्य विकास विभाग, शासकीय तंत्रनिकेतन आणि जिल्हा माहिती कार्यालय विशेष प्रसिद्धी मोहीम राबवणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण गुंतवणूक : १९६.०० कोटी रुपये (एमआयडीसी : ३१ कोटी, टाटा : १६५ कोटी).
प्रशिक्षण क्षमता : प्रतिवर्षी ७,००० विद्यार्थी.
महत्त्वाची तारीख : १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
फायदा : तांत्रिक शिक्षण, उद्योजकता विकास आणि थेट रोजगार निर्मिती.

जिल्ह्याच्या विकासाचा मैलाचा दगड
प्रशासकीय यंत्रणा आणि टाटा टेक्नॉलॉजीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी 'गेम चेंजर' ठरेल. जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीत हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे.
-विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड.

Web Title : बीड में टाटा का CIIIT प्रोजेक्ट: अगस्त तक गेम चेंजर!

Web Summary : टाटा टेक्नोलॉजीज के सहयोग से बीड की CIIIT परियोजना का उद्देश्य बेरोजगार युवाओं को तकनीकी कौशल से सशक्त बनाना है। अगस्त 2026 तक पूरा होने वाला, ₹196 करोड़ का यह प्रोजेक्ट सालाना 7,000 छात्रों को प्रशिक्षित करेगा, जिससे रोजगार के अवसर और जिला विकास को बढ़ावा मिलेगा।

Web Title : Tata's CIIIT Project in Beed: A Game Changer by August!

Web Summary : Beed's CIIIT project, a collaboration with Tata Technologies, aims to empower unemployed youth with technical skills. Set to complete by August 2026, the ₹196 crore initiative will train 7,000 students annually, boosting employment opportunities and district development.