गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:13 AM2019-12-12T00:13:07+5:302019-12-12T00:13:40+5:30

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते.

Godavari vessel sieve; Invalid sand traffic hazard | गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात

गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात

googlenewsNext
ठळक मुद्देरात्री वाहतूक : महसूल-पोलिसांची भूमिका बघ्याची; पर्यावरणाचे होत आहे नुकसान

गेवराई : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. नुकतीच जिल्हाधिकारी पांडेय यांची बदली झाली. त्यानंतर वाळू माफिया सक्रिय झाले असून दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर राजरोसपणे भरुन चालत आहेत याकडे महसूल व पोलिसांचे मात्र, ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे.
गेवराई तालुक्याला गेवराई नदी वरदान लाभलेली आहे. मात्र, या नदीमध्ये मोठ्याप्रमााणात उत्खनन केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील गुंतेगाव, राक्षसभुवन, माळसपिंपळगाव, बोरगाव, सावरगाव, खामगाव, गुळज, नागझरी, आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गंगावाडी, भोगलगाव, पांढरी, राजापूर, मनूबाई जवळा, रामपुरी, गोदी खुर्द, या ठिकाणांवरून वाळूचा सर्रास उपसा होत आहे. तसेच ही वाळू वाहतूक करण्यासाठी १० चाकी हायवा टिप्परचा वापर केला जात आहे. दिवसाढवळ््या वाळू वाहतूक सुरु आहे. तरी देखील गेवराई शहर व बायपास मार्गावरील तसेच हायवे पोलीस व महसूलचे तलाठी, मंडळअधिकारी, नायब तहसीलदार, तहसिलदार यांची भूमिका हाताची घडी-तोंडावर बोट अशा पद्धतीची आहे. त्यांचे याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर महामार्गाचे वाहतूक पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कर्तव्यावर असताना देखील वाळूने भरलेल्या गाड्या जातात कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदी पात्रात पाणी नव्हते त्यावेळी वाळूचा बेसुमार उपसा सुरुच होता. वाळू माफियांनी १५ ते २५ फुटांपर्यंत खड्डे करुन गोदावरी पात्राची चाळणी केली होती. ही बाब जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धडाकेबाज कार्यवाही त्यांनी केली होती. परंतु त्यांची बदली होताच पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे पुन्हा अवैध वाळू वाहतूक सुरु झाली आहे.
गेवराईतील शिष्टमंडळ भेटणार आयुक्तांना
गेवराई गोदा पट्ट्यातून वाळू मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. ती जिल्ह्यात थेट पुणे, मुंबईं औरंगाबाद, अहमदनगर,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पहोचवली जाते. परंतु यामुळे गोदा पात्राची चाळण होत आहे. हे पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी गेवराई येथील एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेण्यार आहे. कार्यवाही न झाल्यासा आयुक्तलयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

Web Title: Godavari vessel sieve; Invalid sand traffic hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.