बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 20:00 IST2023-04-03T19:59:51+5:302023-04-03T20:00:17+5:30
मुलीने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली असल्याची माहिती आहे

बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन
दिंद्रुड (बीड) : आई-वडील शेतात असताना घरी एकटी असलेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत रविवारी सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली.वैष्णवी बापुराव फरताडे (१७, रा.कारी ता.धारूर) असे मृत मुलीचे नाव आहे.
वैष्णवीची नुकतीच बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. परीक्षेनंतर वैष्णवी नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. यातच रविवारी सायंकाळी आई-वडील व भाऊ शेतात कामासाठी गेले. इकडे घरात एकटी असलेल्या वैष्णवीने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह धारूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. आज सकाळी कारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.