गेवराईत व्यापारी, विविध पक्ष, संघटनांचा तहसीलसमोर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST2021-04-07T04:34:40+5:302021-04-07T04:34:40+5:30
गेवराई : जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार निर्बंध लादल्यानंतर व्यापऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी शहरातील ...

गेवराईत व्यापारी, विविध पक्ष, संघटनांचा तहसीलसमोर संताप
गेवराई : जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार निर्बंध लादल्यानंतर व्यापऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. लॉकडाऊन हटाओ, व्यापारी बचाओचा नारा देत व्यापाऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला. तहसीलदारांना निवेदन देत आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
दहा दिवसांचे लॉकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रात्रीपासून राज्य शासनाचे कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधामुळे व्यापारी चांगलाच अडचणीत सापडला. कोरोनाच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी संकटात असताना पुन्हा हे जाचक नियम लादल्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
===Photopath===
060421\sakharam shinde_img-20210406-wa0040_14.jpg