शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:21 IST

अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र ...

अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. ते रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा, अशी सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी केली.

अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार मुंदडा बोलत होत्या. या बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच. पी. एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत आमदार मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध समस्यांकडे लक्ष वेधले. या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२ किलोमीटरपैकी ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुंदडा, वैजनाथ देशमुख, अ‍ॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अभिजीत जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.

काम सुरू होईपर्यंत खड्डे खोदू नका, जिथे पुलाचे काम सुरू आहे, तिथे डांबरी रस्त्याचे वळणमार्ग करा. भाटुंबा व कळमअंबा येथे चार नळ्यांचे पूल बांधावेत. नेकनूर व केज येथील रस्त्यांचे रुंदीकरण, अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक रस्त्याच्या चौपदरीकरणास परवानगी, शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौकाचे सुशोभिकरण करावे, रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नयेत, अशा विविध सूचना उपस्थितांनी अधिकाऱ्यांना दिल्या.