शर्मा खून प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:58 PM2020-02-15T23:58:06+5:302020-02-15T23:59:25+5:30

६१ वर्षीय महिलेचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तसेच ५ लाख व सोन्याचे दागिने चोरून नेले होेते. या खुनातील आरोपी व त्याचा साथिदार अशा दोन आरोपींना दरोडाप्रतिबंधक पथकाने गजाआड केले

Gajaad finally accused in Sharma murder case | शर्मा खून प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड

शर्मा खून प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड

Next
ठळक मुद्देदरोडा प्रतिबंधक पथकाची कारवाई । गेवराईतील अनेक गुन्हे झाले उघड; गेवराईमध्ये वाढली होती गुन्ह्यांची संख्या

बीड : गेवराई शहरातील खडकपुरा भागातील जैन मंदीर परिसरातील (खक्का मार्केट) एका घरात दरोडेखोरांनी १ एप्रिल २०१९ रोजी चोरीच्या उद्देशाने घरातील ६१ वर्षीय महिलेचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तसेच ५ लाख व सोन्याचे दागिने चोरून नेले होेते. या खुनातील आरोपी व त्याचा साथिदार अशा दोन आरोपींना दरोडाप्रतिबंधक पथकाने गजाआड केले असून, त्यांच्याकडून इतर ४ गुन्हे देखील उघड झाले आहेत.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले जवळपास खून, खूनाचा प्रयत्न व जबरी चोरी यासह इतर पाच गुन्हे उघड झाले आहेत. याप्रकरणी शेख नदीम शेख लालू ( वय ३२ रा. नरानी मशीदसमोर, चिंतेश्वर गल्ली गेवराई) व सय्यद मोहम्मद उसमान अली (वय २८ रा. तपेश्वर नगर, झोपडपट्टी घाटनांदूर) या दोन आरोपींना दरोडेप्रतिबंधक पथकाने गेवराई येथून अटक केली. त्यांच्याकडून काही हत्यारे व जवळपास ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आणखी मुद्देमाल व गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दरोडाप्रतिबंधक पथक प्रमुख गजानन जाधव व पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
गेवराई येथील पुष्पाबाई शिवकुमार शर्मा असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त सेवक होत्या. नेहमीप्रमाणे १ एप्रिल २०१९ रोजी रात्री घरात झोपल्या होत्या. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले नगदी ५ लाख रुपये तसेच पुष्पाबार्इंच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, कानातील झुंबर, साखळी तसेच कपाटात ठेवलेल्या अंगठ्या, गंठण असा एकूण ७ लाखांपेक्षा अधिक ऐवज लंपास केला होता. हा ऐवज लुटताना पुष्पाबाई शर्मा यांनी प्रतिकार केला तेव्हा चोरट्याने मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून त्यांचा खून केला होता. त्यानंतर चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले. ही घटना सकाळी ६ वाजता उघडकीस आली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रविण शर्मा यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दोघांनी कबुल केला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापांसून फरार असलेले आरोपी गजाआड करण्यात दरोडाप्रतिबंधक पथकाला यश आले आहे.
गुन्ह्यांची साखळी
याच चोरट्यांनी गेवराई शहरातील मोंढारोड भागातील व्यापाºयाच्या घरी गेटचे कुलूप तोडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. हा गुन्हा देखील वरील आरोपींनी केला होता. त्याचबरोबर धनगर गल्लीमधील घर, दुकाने फोडून ५ लाख ७५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. ही घटना २२ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. तसेच गेवराई तालुक्यातील नागझरी येथे माल घेऊन जाणाºया ट्रक चालकाला अडवून तिघा जणांनी चाकूचा धाक दाखवला होता व चालकाकडून रोख रक्कम सोन्याचे दागिने असा ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता.
गेवराई शहरात ८ फेब्रुवारी २०२० रोजी एका व्यापाºयाच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असता, घराचे मालक व कापड व्यापारी मोहम्मद अब्दुल यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्याबद्दल दरोडाप्रतिबंधक पथकाला खबºयामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार गेवराई येथून दोघांना अटक केली. मात्र, तपासावर असलेले काही गुन्ह्यातील पद्धत एकसारखी असल्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी वरील ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. दरम्यान आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथक गजानन जाधव, सपोनि संदीप सावळे, पोह एम.एन. सोंदरमल, आर.बी. नगरगोजे, एस.एम उबाळे, ए.बी औताडे, सपोउपनि डी.बी आवारे, एम.आर.वाघ, एमएस भागवत पोना एस.एस. जोगदंड, मपोना ए.ए. गव्हाणे, पोशि. एम.एम.चव्हाण, जि.व्ही. हजारे, डी.सी. गित्ते, चापोकॉ ए.ए.दुधाळ, डोंगरे यांनी केली.

Web Title: Gajaad finally accused in Sharma murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.