बीड शहरात सकल मराठा भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:30+5:302021-07-04T04:22:30+5:30

बीड : खासदार छत्रपती संभाजीराजे हे शुक्रवारी बीड शहरात आले असता नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत ...

Funds should be made available for construction of Sakal Maratha Bhavan in Beed city | बीड शहरात सकल मराठा भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

बीड शहरात सकल मराठा भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

बीड : खासदार छत्रपती संभाजीराजे हे शुक्रवारी बीड शहरात आले असता नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी खा. संभाजीराजेंनी बीड शहरात सकल मराठा भवनच्या बांधकामासाठी खासदार फंडातून एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षांनी निवेदन देऊन केली आहे. कोविडमुळे १२ ते १३ कोटी रुपयांचा खासदार फंड शिल्लक असल्याचे सांगत ज्या वेळी हा फंड मिळेल, तेव्हा शक्य तितका निधी देऊ. बीडच्या सकल मराठा भवन उभारणीसाठी फंड कमी पडू देणार नसल्याचे खा. संभाजीराजेंनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी ठराव घेणारी महाराष्ट्रातील बीड नगर परिषद ही पहिली नगर परिषद आहे. समाजासाठी सकारात्मक भूमिका ठेवणारी बीड नगर परिषद आहे. बीड येथे सकल मराठा भवन बांधकामासाठी बीड नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिलेली असून, त्यावर सकल मराठा भवन बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सदर भवनामध्ये समाजाेपयोगी जसे ई-लायब्ररी व इतर आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सकल मराठा भवन उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्षांनी निवेदन दिले. या वेळी न.प.चे बांधकाम सभापती विनोद मुळुक, किशोर पिंगळे, सुभाष सपकाळ, ॲड. महेश धांडे, रवी शिंदे, विठ्ठल गुजर आदी उपस्थित होते.

030721\03_2_bed_1_03072021_14.jpg

भारतभूषण

Web Title: Funds should be made available for construction of Sakal Maratha Bhavan in Beed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.