जुन्या वादातून दोन गटांत फ्रीस्टाईल, ११ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST2021-09-23T04:38:08+5:302021-09-23T04:38:08+5:30

दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या, काठ्यांनी बेदम मारहाण केली. परस्पर विरोधी तक्रारीवरून शिरुर ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा नोंद ...

Freestyle in two groups due to old dispute, crime against 11 people | जुन्या वादातून दोन गटांत फ्रीस्टाईल, ११ जणांवर गुन्हा

जुन्या वादातून दोन गटांत फ्रीस्टाईल, ११ जणांवर गुन्हा

दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या, काठ्यांनी बेदम मारहाण केली. परस्पर विरोधी तक्रारीवरून शिरुर ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

अनिल मनोहर बडे (वय ३२, रा. बडेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ते २१ सप्टेंबरला सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास बैलांना चारा टाकून घराकडे जात असताना लिंबाजी रघुनाथ चौधर याने सार्वजनिक रस्त्यावर त्यांना अडवून जुन्या वादाची कुरापत काढून डोक्यात दगड मारून डोके फोडले. यावेळी इतर सहकाऱ्यांनीही मारहाण केली. सोमा लिंबाजी चौधर, महेश लिंबाजी चौधर, लिंबाजी रघुनाथ चौधर, बबन मुरलीधर बडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सुमन लिंबाजी चौधर (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या घरी असताना जागेच्या जुन्या वादातून मनोहर यादव बडे, अंकुश मनोहर बडे, अनिल मनोहर बडे, सुनील मनोहर बडे, अनिता अंकुश बडे, गीता अनिल बडे, योगिता सुनील बडे यांनी सुमन व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

Web Title: Freestyle in two groups due to old dispute, crime against 11 people