भाटसांगवी, बऱ्हाणपूर येथे मोफत रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:22+5:302021-05-24T04:31:22+5:30
बीड : जिओ जिंदगीच्या वतीने मागील वर्षी भाकरी दिलेल्या गावांमध्ये सध्या मोफत व फिरता दवाखाना नेऊन भूक भागविल्याची ...

भाटसांगवी, बऱ्हाणपूर येथे मोफत रुग्णसेवा
बीड : जिओ जिंदगीच्या वतीने मागील वर्षी भाकरी दिलेल्या गावांमध्ये सध्या मोफत व फिरता दवाखाना नेऊन भूक भागविल्याची उतराई ऐन गरजेच्या वेळी मोफत रुग्णसेवेतून केली जात आहे. जिओ जिंदगी व सेंट एन्स सोशल सेंटरच्या माध्यमातून शुक्रवारी बीड तालुक्यातील भाटसांगवी व बऱ्हाणपूर येथे रुग्णसेवा देण्यात आली. नि:शुल्क सेवादाते डॉ.पंकज घोडके यांनी ही सेवा समाधान देणारी असल्याचे म्हटले. या दोन्ही गावांमध्ये जवळपास २०० रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषध-गोळ्या, सलाइन, इंजेक्शन त्यांना मोफत देण्यात आले.
या शिबिरावेळी भागवत तावरे, भास्कर ढवळे, संतोष ढाकणे, धनंजय गुंदेकर, अशोक येडे, जालिंदर काकडे, सचिन कुटे, सेंट एन्स सोशल सेंटरच्या सिस्टर एनी, रेवती धिवर, ज्योती वाघमारे, मानिषा स्वामी, अविनाश राठोड, तसेच भाटसांगवी येथे कमलेश बोरवडे, राहुल मस्के, किरण चादर, तात्याराम मस्के, दत्ता सोनवणे, प्रदीप सोनवणे, सुदेश मस्के, बन्सी बोरवडे, आकाश चादर हे उपस्थित होते, तर बऱ्हाणपूर येथे सरपंच अशोकराव लांडे, अशोक माने, प्रशांत लांडे, गौरव लांडे, अनिरुद्र क्षीरसागर, अक्षय लांडे, बऱ्हाणपूरचे सर्व गावकरी यावेळी उपस्थित होते.
===Photopath===
230521\23_2_bed_1_23052021_14.jpg
===Caption===
भाटसांगवी, बऱ्हाणपूर येथे मोफत रुग्णसेवा