परळी येथे मोंढ्यातील चार दुकाने आगीत जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:03 IST2018-08-20T12:54:18+5:302018-08-20T13:03:44+5:30

शहरातील मोंढा परिसरात आज पहाटे भीषण आग लागली.

Four shops in Parli were burnt | परळी येथे मोंढ्यातील चार दुकाने आगीत जळून खाक 

परळी येथे मोंढ्यातील चार दुकाने आगीत जळून खाक 

परळी (बीड ) : शहरातील मोंढा परिसरात आज पहाटे भीषण आग लागली. आगीत ४ दुकाने जळून खाक झाली. तीन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीमध्ये २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  

येथील इलेक्ट्रिकच्या दुकानात पहाटे ही आग लागली. यानंतर आग बाजूच्या दुकानात पसरली. आगीची माहिती मिळताच नगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. तिने आग विझवायला सुरुवात केली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने इतर अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलावण्यात आल्या. 

यानंतर वैद्यनाथ साखर कारखाना आणि परळी थर्मल पॉवर स्टेशनचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत चारही दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. 

Web Title: Four shops in Parli were burnt

टॅग्स :fireBeedआगबीड