शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

बीडमध्ये चार माणसं, ६३ जनावरं मेली, शेतीचेही नुकसान; मंत्री, खासदार, आमदार आहेत कुठं?

By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:58 IST

शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीच येईना; नुकसानभरपाई सोडा, पाहणीसाठीही कोणी जाईना

बीड : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आतापर्यंत वीज पडून व इतर अपघातांमध्ये चार माणसे आणि ६३ जनावरे दगावली आहेत. फळबागा, बागायती जमिनींचे नुकसान झाले आहे. रस्ते खचले, पूलही वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वादळ वाऱ्यात घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. असे असतानाही अद्यापतरी लोकप्रतिनिधी म्हणून एरव्ही बांधावर जाऊन फोटोसेशन करणारे मंत्री, खासदार, आमदार सामान्यांच्या मदतीसाठी धावलेले नाहीत. नुकसानभरपाई देणे तर सोडाच पण साधी भेट देण्याची तसदीही कोणी घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांना कोणी वाली आहे की नाही? मंत्री, खासदार, आमदार आहेत तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साधारण ७ जूननंतर पावसाला सुरुवात होत असते. परंतु यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळा तर वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात शेतात काम करताना, घरी जाताना, गोठ्यात बसल्यावर अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. तसेच अंगावर झाड पडून, वीज पडून व इतर नैसर्गिक अपघातात आतापर्यंत ६३ लहान-मोठे जनावरी दगावली आहेत. तसेच पावसाने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना भरपाई देण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे. परंतु अद्याप तरी मंत्री, खासदार, आमदार हे बांधावर गेलेले नाहीत. खरीप पेरणी झालेली नसली तरी त्या आधीही भरपूर नुकसान झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तरच शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यास मदत होणार आहे.

३८ हेक्टर जमीन खरडून गेली२२ मे रोजी आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. तसेच याच पावसाने तब्बल ३८ हेक्टर जमीन खरडून गेल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

अशी आहे नुकसानीची आकडेवारीजीवितहानीमयत - ४जखमी - ३जनावरे - ६६

शेतीचे नुकसानबागायत जमीन - १३३ हेक्टरफळबाग - ७७ हेक्टरघरांची पडझड - ३३गोठे - ६

मदतीसाठी सरसावले शेकडो हातवडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमन्यू पांडुरंग नलबे (४०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली, एक मुलगा आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने मदतीसाठी शेकडाे हात सरसावले. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भेट देत मदत केली. परंतु विद्यमान कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, असे बद्रिनाथ व्हरकटे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत हेच राजकीय नेते दिवसातून चार चकरा मारत होते. अशीच अवस्था इतर ठिकाणची आहे.

अजित पवार बीडचे पालकमंत्रीअजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी सोमवारी सकाळीच बारामतीमध्ये जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परंतु बीड जिल्ह्यातही अनेकांचे जीव गेले असून, नुकसानही झाले आहे. ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना येणे शक्य नसले तरी इतर मंत्र्यांना पाठवून त्यांनी पाहणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा राहील. दोन दिवसांपूर्वी आलेले मंत्री संजय शिरसाट यांनीही अनेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या; परंतु नुकसानीची पाहणी अथवा मयतांच्या कुटुंबांची भेट घेतली नाही.

बीड शहरात पायी चालणे अवघडबीड शहरात तर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. थोडाही पाऊस झाला की नाल्यातील पाणी आणि कचरा रस्त्यांवर येतो. सर्वत्र घाणच घाण आणि चिखल होतो; परंतु यावरही कोणीच बोलायला तयार नाही. निवडणुका जाहीर होताच पाण्यासाठी काही लोक आक्रमक झाले आणि पत्रकबाजी केली. परंतु नंतर त्याचे पुढे काय झाले? याचा कोणीही पाठपुरावा केला नाही. याचा त्रास सामान्य बीडकरांना बसत आहे. अशीच अवस्था इतर शहरे आणि अनेक गावांमधील आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी