जीप अपघातात चार भाविक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 04:31 IST2017-04-25T02:11:13+5:302017-04-25T04:31:02+5:30

महापूजेसाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या जीपला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिल्याने चौघे ठार झाले तर अन्य आठ जण जखमी झाले.

Four devotees killed in Jeep accident | जीप अपघातात चार भाविक ठार

जीप अपघातात चार भाविक ठार

बीड : महापूजेसाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या जीपला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिल्याने चौघे ठार झाले तर अन्य आठ जण जखमी झाले. ही घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वानगाव फाटा (ता. बीड) येथे सोमवारी पहाटे तीन वाजता घडली. जीपमधील सर्व प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अक्षदा संजय चौधरी (१६), जया चोपडे (४५), प्रदीप निनाजी खर्चे (३५) आणि दिनेश निवृत्ती खर्चे (६० सर्व रा. शेलगाव बाजार, ता. मोताळा जि. बुलडाणा) अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश खर्चे व जीपचालक अविनाश सोळंके गंभीर जखमी आहेत.

Web Title: Four devotees killed in Jeep accident