शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

शिक्षक कॉलनीत जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:29 AM

माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी अज्ञात चार चोरट्यांनी कडीकोंडा तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी अज्ञात चार चोरट्यांनी कडीकोंडा तोडून जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.येथील शिक्षक राजाराम बाबासाहेब जाधव व कुटुंबीय घरात झोपलेले होते. यावेळी अज्ञात चार चोरट्यांनी गुरुवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान कडीकोंडा तोडला व घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी जाधव यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, नगदी रक्कम असा ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेमुळे जाधव कुटुंबिय घाबरलेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस सुरु झाल्याने फिर्याद देण्यास त्यांना उशीर झाला. शुक्रवारी त्यांनी माजलगाव शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भर वस्तीतील जबरी चोरीमुळे पोलिसांना एक प्रकारचे आव्हान चोरट्यांनी दिल्याचे दिसून येत आहे. तसेच झालेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. तपास सपोनि राठोड करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी