धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:29 PM2019-11-27T23:29:11+5:302019-11-27T23:29:47+5:30

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Forced theft by sharp weapon | धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

Next

कडा : आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
लिंबोडी येथील आजिनाथ सुभानराव आंधळे यांचे कडा लिंबोडी रस्त्यालगत घर आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व गाढ झोपेत होते. यावेळी तोंडाला बांधलेल्या तिघांनी हातात धारदार शस्त्र घेऊन घराचे दार तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान घरातील मंडळी जागी झाली होती. मात्र, त्यांना धारदार शस्त्र दाखवून ‘आरडा-ओरड करायची नाही’ अशी धमकी दिली. तसेच घरातील मौल्यवान वस्तू कुठे आहेत. पैसे व इतर वस्तू चोरण्याच्या उद्देशाने दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी टी.व्ही. टेबलच्या लॉकरमध्ये ठेवलेले आठ तोळ््यांचे सोन्याचे दागिने, बारा हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल असा ऐवज चोरी केला. त्यानंतर देखील चोरट्यांनी घरातील व्यक्तींना धमकावले व पुन्हा घराचे दार बाहेरून लावून पोबारा केला. त्यानंतर घरातील व्यक्तींनी आरडाओरड केली. त्यानंतर गावातील नागिरकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी लिंबोडी येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि सलीम पठाण हे करत आहेत.
पहाटेच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवून केलेल्या या जबरी चोरीमुळे लिंबोडी या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची व चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.
गळ्याला चाकू लावताच महिला झाली बेशुद्ध
अज्ञात तीन-चार चोरट्यांनी तोंड बांधून घरात प्रवेश करताच आमच्या गळ्याला चाकू लावला आणि आरडाओरडा केला तर जिवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान गळ््याला चाकू लावताच घरातील रामकवर नामक महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर नेमके काय करावे, हेच त्यांना सुचले नाही. शुद्धीवर आल्यावर त्या म्हणाल्या ‘नशीब चांगले म्हणून काही बरेवाईट झाले नाही. असे रडत-रडत रामकवर आंधळे यांनी बेतलेला प्रसंग सांगितला’ यावेळी घरातील सर्वच जण घाबरलेले होते.

Web Title: Forced theft by sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.