शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अन्न व औषध प्रशासनाची माजलगावात कारवाई; अनेक दुकानदारांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 5:28 PM

कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकजण दुकानदारांचे पलायन 

माजलगाव (बीड ) : शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही मोठया प्रमाणावर उघडयावरच सर्रास खाद्यपदार्थांची विक्री सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छता तर अनेकांकडे परवानेच नाहीत अशा परिस्थितीत नागरिकांच्या जिवीताशी चाललेल्या खेळावर आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या या कारवाईत स्विटमार्ट, जिलेबी सेंटर, हॉटेल तसेच हातगाडे आदी खाद्यपदार्थ विक्री ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. 

शहरातील संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक व बायपास या ठिकाणी सुमारे 100 ते 150 विविध खाद्यपदार्थांचे हातगाडे लागतात ज्यात वडापाव, जिलेबी, भजे, चिकन, अंडा ऑम्लेट, पावभाजी, चाईनिज आदी खाद्यपदार्थांची सर्रास उघडयावरच विक्री करण्यात येते. हे खाद्यपदार्थ  अत्यंत अस्वच्छ वातावरणात व अस्वच्छ भांडयांमध्ये तयार केले जातात. पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जाते , अशा पध्दतीने तयार केले जाणारे निकृष्ट व अस्वच्छ पदार्थ खाल्याने नागरीकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो. सध्या  पावसाळयाचे दिवस असल्यामुळे तर या पदार्थामुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत काही जागरूक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. 

सहाय्यक आयुक्त के.एन.दाभाडे व त्यांच्या पथकाने हरियाणा जिलेबी सेंटरची झाडा झडती घेतली असता या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता , गलिच्छ भांडे तसेच जिलेबी तळण्यासाठी वापरण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे तेल, जिलेबीत अखाद्य रंगांचा वापर होत असल्याचे त्यांना आढळुन आले. गुरुकृपा स्विटमार्ट मधील विविध खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून सिल करण्यात आले. अनेक हॉटेल, हातगाडे, स्विटमार्ट इत्यादींवर कारवाईची पक्रिया दिवसभर सुरु राहिली. अधिक तपासणीसाठी या ठिकाणाहून खाद्यपदार्थांची  नमुने ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक दुकानदारांनी कारवाईच्या भितीने दुकाने बंद करून पळ काढला. 

कठोर कारवाई करण्यात येईल माजलगांव शहरात विनापरवाना व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणारांची संख्या मोठी आहे. अशा दुकानधारकांवर या पुढे देखील सातत्याने कारवाई करण्यात येईल. विक्रेत्यांनी योग्य परवाने घ्यावेत. प्रतिष्ठाने स्वच्छ न ठेवल्यावर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. -  के.एन. दाभाडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बीड 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागBeedबीडraidधाड