शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बीड जि.प.त महाविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:04 AM

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महिला बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातील पाचेगाव जि.प.गटाच्या शिवसेनेच्या यशोदा बाबुराव जाधव यांची तर समाजकल्याण सभापतीपदी तालखेड जि.प.गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कल्याण आबूज यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देभाजपची ऐन वेळी माघार; सर्व सभापती बिनविरोध : महिला बालकल्याण सभापतीपदी यशोदा जाधव, समाजकल्याण सभापतीपदी कल्याण आबूज

बीड : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महिला बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातील पाचेगाव जि.प.गटाच्या शिवसेनेच्या यशोदा बाबुराव जाधव यांची तर समाजकल्याण सभापतीपदी तालखेड जि.प.गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कल्याण आबूज यांची बिनविरोध निवड झाली. विषय समिती सभापतीपदी धारुर तालुक्यातील तेलगाव जि.प.गटाचे सदस्य जयसिंह सोळंके तर गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हा परिषदेत ४ जानेवारी रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ३२ विरुद्ध २१ मतांनी विजय संपादन केला होता. तर शुक्रवारी समाजकल्याण, व महिला बालकल्याण या दोन समित्यांच्या सभापतींची तसेच दोन विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली.जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी १० ते २ या वेळेत सदस्यांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. समाजकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून कल्याण साहेबराव आबूज यांचे २ अर्ज तर भाजपकडून भागवत बळीराम नेटके यांचा एक अर्ज दाखल झाला होता. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीच्या यशोदा बाबुराव जाधव, स्वतंत्र शोभा उद्धव दरेकर व भाजपकडून सविता रामदास बडे यांचे अर्ज दाखल झाले. याशिवाय विषय समिती सभापती निवडीसाठी शिवसेनेचे युध्दाजित बदामराव पंडीत यांचे दोन, महाविकास आघाडीचे जयसिंह धैर्यशील सोळंके यांचे दोन, भाजपकडून जयश्री बालासाहेब शेप यांचे दोन अर्ज दाखल होते. तसेच भाजपकडून सदस्य अविनाश अशोक मोरे, अशोक चांदमल लोढा यांचे प्रत्येकी १ असे एकूण ९ अर्ज दाखल झाले होते.पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मच्छिंद्र सुकटे व सहाय्यक अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सर्व अर्जाची छाननी केली. सर्व अर्ज वैध ठरल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान दुपारी पावणेतीन ते तीन या वेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. यावेळेत समाजकल्याण सभापती पदाच्या निवडीतून भागवत नेटके यांनी तर महिला व बालकल्याण सभापती निवडणुकीतून सविता बडे व शोभा दरेकर या सदस्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे समाजकल्याण सभापतीपदी कल्याण आबुज तसेच महिला व बालकल्याण सभापतीपदी यशोदा जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सुकटे यांनी घोषीत केले.निवड प्रक्रिया पार पडेपर्यंत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवड प्रक्रि या शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.धनंजय मुंडेबीडमध्ये ठाण मांडूनसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी बीडमध्ये होते. गुरुवारपासून सुरु असलेला पेच सोडवित महाविकास आघाडीचे ऐक्य राखण्यात ते यशस्वी झाले. दरम्यान या निवडीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व सदस्यांचे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानत जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली. राज्यात आणि जिल्हा परिषदेत एकाच आघाडीचे सरकार आल्याने विकासाला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .यावेळी आ. प्रकाश दादा सोळंके , आ.बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडीत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सुनील धांडे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौंड, जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाट , उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडे