बीड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील विशेष न्या. एम. व्ही. मोराळे यांच्या न्यायालयाने सुनावली. तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत एका गावात २८ ऑक्टोबर २०१७ रोजी बोकडाला औषध लावण्यासाठी तुमच्या मुलीस घेऊन जात असल्याचे सांगून या मुलाने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. गढवे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात झाली. विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर त्यास न्यायालयाने दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मंजूषा दराडे यांनी बाजू मांडली. व्ही. डी. बिनवडे व महिला पोलीस नाईक सी. एस. नागरगोजे यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.
अत्याचारप्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:05 IST