शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

बीड जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:22 AM

जिल्ह्यात बुधवारी बीड तालुक्यातील च-हाटा फाटा येथे दोघांचा तर धारूर तालुक्यातील कारी येथे एकाचा अपघाती मृत्यू झाला.

ठळक मुद्देच-हाटा फाटा दोघांचा, तर कारी येथे एकाचा अपघाती मृत्यू; मैंद्यात ट्रॅक्टर चालक ठार

बीड : जिल्ह्यात बुधवारी बीड तालुक्यातील च-हाटा फाटा येथे दोघांचा तर धारूर तालुक्यातील कारी येथे एकाचा अपघातीमृत्यू झाला. बीडजवळील चºहाटा फाट्याजवळ भरधाव बसने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले तर धारुर तालुक्यात पादचारी तरुणास कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच बीड तालुक्यातील मैंदा येथे ट्रॅक्टरच्या टायरखाली सापडून चालक जागीच ठार झाला.आष्टी आगाराच्या बीडहून बारामतीकडे जाणाऱ्या बसने (एमएच४० एन-९१७६) बीड शहरानजीक चºहाटा फाट्याजवळ बुधवारी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच ४३ टी४५४२) ला समोरासमोर धडक दिली. या अपघातात पुणे येथून परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे जाणाºया राजेश्वर वसंतराव घुमरे (२९ ) व कुलदीप सदाशिव ठोके (२८, दोघे रा.गाढे पिंपळगाव, ता.परळी) हे दोघे जागीच ठार झाले आहेत. ते दोघेही पुण्यात एका खासगी कंपनीत काम करीत होते.राजेश्वरच्या चुलत्याचे निधन झाल्याने राख सावडण्याच्या कार्यासाठी ते गाढेपिंपळगाव येथे जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक कुलदीपच्या डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे झाले. दुचाकीही चक्काचूर झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी ठाणेप्रमुख सपोनि सुजित बडे , सहायक फौजदार दिनकर एकाळ, पोना भागवत शेलार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मयतांची ओळख पटवून नातेवाईकांना कळविले.दरम्यान मयत राजेश्वर याचे वडील-आई आणि भाऊ कर्नाटक राज्यात ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेले आहेत. त्यांना देखील अपघाताची माहिती देण्यात आली आहे.टायरखाली सापडून ट्रॅक्टर चालक ठारबीड तालुक्यातील मैंदा येथे ट्रॅक्टर (एमएच ४४ डी ४०६२) च्या चाकाखाली मोठा दगड आल्याने चालक अमोल उजगरे (वय २५) हा तोल गेल्याने खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक अंगावरुन गेल्याने अमोल जागीच ठार झाला. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय साईप्रसाद पवार, सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच अमोल याचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू