पहिल्याच पावसाने कडा-देवळाली रस्त्यावर साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:54+5:302021-06-04T04:25:54+5:30
कडा- सध्या पावसाला सुरुवात झाली असून, तालुक्यात ठीक-ठिकाणी पहिल्या पावसाने हजेरी लावली. याच पावसात कडा-देवळाली रस्त्यावर पाणी साचत असल्याने ...

पहिल्याच पावसाने कडा-देवळाली रस्त्यावर साचले तळे
कडा- सध्या पावसाला सुरुवात झाली असून, तालुक्यात ठीक-ठिकाणी पहिल्या पावसाने हजेरी लावली. याच पावसात कडा-देवळाली रस्त्यावर पाणी साचत असल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरवर्षीच दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. याकडे लक्ष देऊन ही दयनीय अवस्था कायमस्वरूपी काढून टाकावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा-देवळाली रस्त्यावर असणाऱ्या डोंगरगणच्या अलीकडे रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी बोलूनदेखील याकडे सारखे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरच तळे साचत असल्याने दुचाकीचालकांना तर जीव मुठीत घ्यावा लागतो. एवढेच नव्हे, तर अनेकवेळा दुचाकीचालक मध्येच गाडी बंद झाल्याने पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी याकडे लक्ष देऊन त्वरित या पाण्याला मार्ग काढून देत लोकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. पी. जोरवेकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यानी फोन न घेतल्याने त्याची बाजू घेता आली नाही.
===Photopath===
030621\20210603_112243_14.jpg