करंजवन येथे गोळीबार, पिस्टल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:46 PM2019-08-20T23:46:26+5:302019-08-20T23:46:59+5:30

पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे सैन्यातील नौकरी सोडून आलेल्या एका माजी सैनिकाने सोमवारी रात्री उशिरा गोळीबार केला होता.

Firing, pistol at Karanjavan | करंजवन येथे गोळीबार, पिस्टल हस्तगत

करंजवन येथे गोळीबार, पिस्टल हस्तगत

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी दिली भेट : रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल

बीड : पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे सैन्यातील नौकरी सोडून आलेल्या एका माजी सैनिकाने सोमवारी रात्री उशिरा गोळीबार केला होता. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान गोळीबार करणाऱ्यांकडून पिस्टल हस्तगत केले असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला.
करंजवन येथे डोंगरेश्वर संस्थान महादेवाचे मंदिर आहे. श्रावणी सोमवार असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ दर्शनासाठी गेले होते. त्याच ठिकाणी केळी वाटप करण्यात येत होती यावेळी हातातून प्रसाद पडल्याच्या कारणावरुन सागर तात्यासाहेब गर्जे व खाडे या दोघांशी आरोपी राजू चांगदेव खाडे व दादा चांगदेव खाडे यांचा वाद झाला होता. यापुर्वी देखील त्यांच्यात वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, सोमवारी ३ वाजण्याच्या सुमारास यातील सैन्यातील नौकरी सोडलेल्या खाडे यांने पिस्टलमधून गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. दरम्यान संबंधित पोलीस ठाण्याकडून ही अफवा असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र, गोळीबार झाल्याची चर्चा झाल्यामुळे तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले होते. त्यानुसार पाटोदा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला अटक केली होती मात्र, पिस्टल हस्तगत झाले नव्हते. दरम्यान, उपाधीक्षक विजय लगारे, स्थागुशा प्रमुख घनश्याम पाळवदे, पोनि सिद्धार्थ माने, उपनि वैशाली पेटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सागर गर्जे याच्या फिर्यादीवरुन राजू खाडे व दादा खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावरुन पोलिसांनी अटक केली होती मात्र हत्यार हस्तगत झाले नव्हते. पोलिसांनी खाक्या दाखवत चौकशी केल्यानंतर आपण गोळीबार केल्याची कबुली दिली. हे पिस्टल हस्तगत केले. तपास विजय लगारे करत आहेत.

Web Title: Firing, pistol at Karanjavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.