शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर जप्त केलेली अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार कोर्टाने सोडली, काय आहे प्रकरण?

By शिरीष शिंदे | Updated: May 10, 2024 17:37 IST

लेखी हमी दिल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारची चावी संबंधिताना देण्यात आली.

बीड: जमीन संपादनाचा वाढीव मावेजा एक महिन्याच्या कालावधीत न्यायालयात जमा केला जाईल, अशी लेखी हमी बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायालयास दिली. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश-५ के. आर. जोगळेकर यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची जप्त केलेली कार सोडून देण्याचा आदेश गुरुवारी दिला. यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रामभाऊ ऊर्फ रामराव देवराव पवळ यांची १९९५ साली जमीन गावठाण वस्तीवाढ योजनेंतर्गत संपादित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने एलएआर क्रमांक १२१६/१९८९ या प्रकरणात २४ जुलै १९९५ रोजी आदेश पारित करून कलम १८ नुसार वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला होता. परंतु मावेजा न मिळाल्यामुळे रामराव पवळ यांच्या वारसाने जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. २ लाख ३५ हजार ९५१ रुपयांचा भरणा करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश-५ के. आर. जोगळेकर यांनी संबंधित विभागास दिला होता. परंतु त्याचा भरणा झाला नसल्याने ६ मे रोजी अपर जिल्हाधिकारी यांची कार क्रमांक एमएच-२३, बीसी-३१२२ जप्त करण्यात आली होती. दरम्यान, सदरील प्रकरणावर जिल्हा न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.

एक महिन्यात वाढीव मावेजा देण्याची हमीसुनावणीदरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव या स्वत: उपस्थित होत्या. एक महिन्यात वाढीव मावेजाची रक्कम दिली जाईल, अशी लेखी हमी दिल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारची चावी संबंधिताना देण्यात आली. एक महिन्याच्या कालावधीत वाढीव मावेजा रक्कम न्यायालयात जमा करण्यात येईल, या अटीवर कार सोडून देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडCourtन्यायालयBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड