खड्डे बुजवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:00+5:302021-02-13T04:33:00+5:30
बालेपीर परिसरात नवे आरोग्य केंद्र सुरू करा बीड : नगर परिषेदेने बालेपीर परिसरात आरोग्य केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी ...

खड्डे बुजवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
बालेपीर परिसरात नवे आरोग्य केंद्र सुरू करा
बीड : नगर परिषेदेने बालेपीर परिसरात आरोग्य केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी मोहम्मद खमरोद्दीन यांनी केली आहे. बालेपीर दक्षिण-उत्तर बाजू आदित्यनगर, नवीन इदगाह परिसर, अंकुशनगर, ग्रामसेवक कॉलनी, अंबिका चौक, शिंदेवस्ती, गोरेवस्ती परिसर विकसित होत आहे. या भागात रुग्णालय नसल्याने जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे बालेपीर परिसरात आरोग्य केंद्र उभारणीचे निवेदन देण्यात आले.
नेकनूर परिसरातील नद्यांतून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिप्पर व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटांची गर्दी
बीड : येथील आरटीओ कार्यालयात सध्या एजंटांची पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. परवाना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी हे एजंट लोक पैशांची मागणी करून सामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून एजंटांच्या कामाला येथील अधिकारीही प्राधान्य देत आहेत.