धारदार शस्त्राने हल्ला परस्परविरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST2021-02-14T04:31:57+5:302021-02-14T04:31:57+5:30
बीड : शहर पोलीस ठाणे हद्दीतील डी.पी. रोड सहयोगनगर भागात दोन गटात मारहाण झाली. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी ...

धारदार शस्त्राने हल्ला परस्परविरोधी गुन्हे दाखल
बीड : शहर पोलीस ठाणे हद्दीतील डी.पी. रोड सहयोगनगर भागात दोन गटात मारहाण झाली. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध परस्परविरोधी फिर्यादी आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती, १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही गुन्हे दाखल झाले.
पहिल्या गुन्ह्यात यश अजय सवाई याच्या फिर्यादीवरून शहरातील सहयोगनगर भागात रोहित शिरसाट याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. यावेळी अजय हा त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेला होता. यावेळी कुकरीसारख्या धारदार शस्त्राने सवाई याच्या छातीवर वार केला. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात यश जगदीश गुरखुदे, गणेश राजकुमार गुरखुदे, राजकुमार फुलंचद गुरुखुदे, आदेश गायकवाड, आदित्य कुलथे (रा. धोंडीपुरा बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर आदित्य चंद्रकांत कुलथे याला भावासोबत का राहतो, असे भांडणाचे कारण काढून मारहाण करण्यात आली. हे भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर कुकरीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले, याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गौरव दीपक सवाई, दीपक सवाई, यश अजय सवाई, पीयूष सवाई, राज शिरसाट, गणेश राजू घोडके (सर्व रा. माळीवेस बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपाधीक्षक संतोष वाळके करत आहेत.