बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:55 AM2020-05-17T01:55:29+5:302020-05-17T06:48:02+5:30

अंबाजोगाई (जि. बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन ...

File charges within 50 days in Beed massacre case: Dhananjay Munde | बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

Next

अंबाजोगाई (जि. बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल, असे सांगतानाच सदर प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.
अंबेजोगाई येथे पालावर राहणाºया पवार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य त्यांना देण्याबाबत स्थानिक तहसीलदारांना आदेशित केले. तसेच विभागामार्फत घरकुल योजनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुंडे म्हणाले.
हत्या झालेल्या तिन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येकी ४ लाख १२ हजार रु पये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रु पये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.

Web Title: File charges within 50 days in Beed massacre case: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.