बसस्थानकातच राडा; प्रवासी-कंडक्टर महिलांमध्ये हाणामारी
By सोमनाथ खताळ | Updated: August 26, 2023 23:13 IST2023-08-26T23:13:45+5:302023-08-26T23:13:57+5:30
याप्रकरणाचा तपास पोहेकाॅ. गवळी करत आहेत.

बसस्थानकातच राडा; प्रवासी-कंडक्टर महिलांमध्ये हाणामारी
धारूर (जि.बीड) : येथील बसस्थानकात महिला कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. कंडक्टरच्या तक्रारीवरून धारुर पोलिस ठाण्यात प्रवासी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगावरून बस (एमएच २०, बीएल १२५) धारूर आगारात आली असता महिला प्रवाशाने कंडक्टरला ‘अंबाजोगाईत बस का थांबवली नाही’ यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कंडक्टर संगीता दिनकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैशाली अशोक चिरके (रा. जहागीरमोहा, ता. धारूर) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकाॅ. गवळी करत आहेत.