शेतीसाठीच्या पाण्यासाठी कालव्यात उतरून शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 06:54 PM2018-05-25T18:54:00+5:302018-05-25T18:54:00+5:30

शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले.

Farmers jalsamadhi movement for agricultural water supply | शेतीसाठीच्या पाण्यासाठी कालव्यात उतरून शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

शेतीसाठीच्या पाण्यासाठी कालव्यात उतरून शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

Next

केज (बीड ) : शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.   

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, यामुळे धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूस असलेल्या शेतीला पूरक पाणी मिळत नव्हते. यातून  शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने हे पाणी बंद करावे आणि विद्युत पंपाचा वीज पुरवठा सुरु करावा अशी मागणी १५ गावच्या शेतकऱ्यांनी केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सकाळी शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडलेल्या उजव्या कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. सायंकाळ पर्यंत हे आंदोलन सुरु राहिल्याने शेवटी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनात मुकूंद कणसे, उमाकांत भूसारे , सतिश शिंदे , काशिनाथ भिसे ,प्रताप सोमवंशी , बब्रुवान कणसे आदींचा सहभाग होता.

Web Title: Farmers jalsamadhi movement for agricultural water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.