शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : कोरोनाच्या सावटामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. या काळात शेतीमालाचे भाव ...

अंबाजोगाई : कोरोनाच्या सावटामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. या काळात शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले, त्यात भर म्हणजे अतिवृष्टीने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरिण यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी सध्या परिसरात उभ्या असणाऱ्या ज्वारी व उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. हरणांची मोठी कळपं या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहेत. त्यांचा पिकांवर सुरू असलेला मुक्तसंचार धोकादायक ठरू लागला आहे. या वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे यांनी केली आहे.

शहर बससेवा सुरू करा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक असा मोठा पल्ला शहरवासीयांना पार करावा लागतो. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या भागात स्वा.रा.ती. रुग्णालयामार्गे शहर वाहतूक बससेवा सुरू झाल्यास शहरवासीयांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी सुरू झालेली ही सेवा बंद झाली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे.

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फाटे तोडून नेत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वनविभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

उन्हाची तीव्रता वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी व उन्हापासून संरक्षण करणारे कपडे, उपरणे, टोप्यांची विक्री सुरू झाली आहे.