शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हरभरा खरेदीसाठी माजलगावात शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:37 IST

माजलगाव येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देदोन तास राष्टÑीय महामार्ग ठप्प

माजलगाव : येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल दोन तास हे आंदोलन चालले.

नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र येथील बाजार समिती मार्फत सुरु होते. हजारो शेतक-यांनी आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करुन हरभरा विक्रीसाठी या ठिकाणी आणला. केंद्र सुरु झाल्यानंतर जवळपास १७ हजार ८८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात बारदाना व गोदामाअभावी अनेक दिवस खरेदी केंद्र बंद राहिले. परिणामी संपुर्ण बाजार समिती आवारात तब्बल ३५ हजार क्विंटल हरभरा साठला तसेच खरेदी केलेली ५ हजार क्विंटल तूरदेखील बाजार समितीच्या आवारात पडून आहे.

हरभरा खरेदी बंद करुन शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरल्यामुळे शुक्रवारी बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती निळकंठ भोसले, पंचायत समिती सभापती जयदत्त नरवडे, प्रभाकरराव होके, रामेश्वर जमदाडे, प्रशात शेटे, शंतनु सोळंके, बालासाहेब जाधव, बाळासाहेब आगे, अंतराव सोळंके, सुहासराव सोळंके, पांडुरंग वगरे आदींसह हजारो शेतकºयांनी आंदोलन केले. गुन्हे दाखल झाले तरी बेहतर, आम्ही मरायला देखील तयार आहोत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना आंदोलनस्थळी येण्याचे कळविले. उन्हाचा पारा वाढत होता. घोषणा बाजी सुरु होती. अखेर दीड तासानंतर तहसीलदार आले व संध्याकाळपर्यंत संपुर्ण हरभºयाचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, गुरुवारपासून माजलगाव परिसरात पाऊस झाला आहे. उघड्यावरील हरभरा भिजण्याची शक्यता वाढली आहे.तहसीलदार अर्धा तास उन्हात : भेट दिले हरभºयाचे पोतेआंदोलक एवढे संतापले होते की, तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना रस्त्यावर भर उन्हात अर्धातास बसविले. यावेळी चर्चेनंतर आंदोलकांच्या धसक्याने तहसीलदारांनी कुठलीही वेळ न दवडता पंचनाम्यास लगेचच सुरुवात केली. तहसीलदार एन.जी. झंपलवाड हे आंदोलनस्थळी दीड तास उशिरा आल्याने त्यांच्या पुढयात हरभ-याचे पोते ठेवुन आता याचं काय करायचं असा सवाल करीत हे पोत तुम्हालाच भेट घेवून जा असे म्हणुन आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलनMarathwadaमराठवाडा