शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:53 PM

माजलगाव : शहरातील जिनिंगवरील शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच ...

ठळक मुद्देग्रेडरला आवर : खरेदी केंद्रानंतर तणाव निवळला

माजलगाव : शहरातील जिनिंगवरील शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे शुक्रवारी टीएमसी केंद्रावर शेतक-यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर भाजप नेते रमेश आडसकर यांच्या पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली. तसेच आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला.आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत आहेत. तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनिंग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे. या तुलनेत शेतकºयांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहेत. त्यात ग्रेडर अनंत मोरेच्या मनमानीमुळे शेतकरी व ग्रेडरमध्ये खटके उडत आहेत.चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र केंद्रावर मापासाठी तिष्ठत राहावे लागत होते. शुक्रवारी दुपारी संयम सुटल्याने शेतक-यांनी टीएमसी केंद्रावर ठिय्या आंदोलन केले. तेथे आडसकर यांनी शेतक-यांचे प्रश्न समजुन घेतले. त्यानंतर संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास भाग पाडले. तत्काळ पूर्वा जिनिंगवरील शासकीय केंद्र सुरु केले.दरम्यान सोमवारी आणखी एक खेंद्र सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतक-यांनी त्यांची वाहने हलवली. कापसाची जवळपास चारशे वाहने तीन खरेदी केंद्रांवर विभागून दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक,ईश्वर खुरपे,मनोज फरके उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन