बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:44+5:302021-02-07T04:31:44+5:30
बीड : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, ...

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन
बीड : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनांच्या वतीने एकत्र येत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. माजलगाव तालुक्यातील नित्रुडमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या दुपारी चक्का जाम आंदोलन करून, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे, मोठेवाडी फाटा (रामगाव) तेथे शेतकरी कामगार पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेतेभाई ॲड.नारायण गोले पाटील, माकपचे कॉम्रेड मुसद्दीक बाबा आदींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने समविचारी शेतकरी संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. प्रा.सुशिला मोराळे, कुलदीप करपे, कॉ.मोहन जाधव, दादासाहेब मुंडे, राजकुमार घायाळ, राजू गायके आदींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.