शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा संताप; ताफा अडवत बीड जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:39 IST

रस्तारोको करत नुकसान भरपाईत दुजाभाव झाल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

- नितीन कांबळेकडा: अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. पावणे दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप देखील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केद्रीय पथकाचा दौरा आटोपताच पीडित शेतकऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा ताफा अडवला. रस्तारोको करत नुकसान भरपाईत दुजाभाव झाल्याचे आरोप करत संताप व्यक्त केला. 

आष्टी तालुक्यातील देवळाली व घाटा पिंपरी येथे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता केद्रीय पथक आले. घाटा येथील पाहणी करून पथक देवळालीत गेले. तिथून पाहणी झाल्यानंतर पथक अहिल्यानगरकडे रवाना झाले. दरम्यान, बीडकडे निघालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अनेक विभागातील अधिकाऱ्यांचा ताफा बाधित शेतकऱ्यांनी माळीमळा येथे अडवला. शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने उत्तर देताना जिल्हाधिकारी काहीसे चिडल्याचे दिसून आले.  

दरम्यान, तहसीलदार वैशाली पाटील यांना बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठीच जात असल्याचे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढल्यावर जिल्हाधिकाऱ्याची वाट मोकळी झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rain-hit farmers block Beed Collector's convoy, demand compensation!

Web Summary : Frustrated by delayed compensation after heavy rains, farmers in Ashti blocked the Beed Collector's convoy. They protested alleged discrimination in relief distribution and demanded immediate action during his visit following a central team's inspection.
टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीRainपाऊस