कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:52 IST2019-03-26T00:51:51+5:302019-03-26T00:52:16+5:30

कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Family dispute; Wife's blood | कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीचा खून

कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीचा खून

कडा : कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अनिता रामा पवार (४५ रा.चिवा ता.जि.रायगड) असे मयत महिलेचे नाव आहे. चोभानिमगाव येथे कोळसा तयार करण्यासाठी मच्छिंद्र राठोड (आल्हणवाडी ता.पाथर्डी) यांनी कामगार म्हणून अनिता व रामा पवार या दांपत्याला आणले होते. हे दोघेजण पालात राहून काम करत असत. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला. यातून रामाने पत्नी अनिताला लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
राठोड यांच्या फिर्यादीवरून आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी रामाला अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

Web Title: Family dispute; Wife's blood