खोटी फिर्याद दिल्याने डॉक्टर, नर्सवर गुन्हा; वडवणीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:48 IST2018-11-30T00:48:02+5:302018-11-30T00:48:22+5:30
शासकीय कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी वडवणी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व नर्स विरोधात खोटी फिर्याद दिली म्हणून न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यातील विठ्ठल नामदेव झाडे यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता झाली आहे. दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

खोटी फिर्याद दिल्याने डॉक्टर, नर्सवर गुन्हा; वडवणीतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : शासकीय कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी वडवणी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व नर्स विरोधात खोटी फिर्याद दिली म्हणून न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यातील विठ्ठल नामदेव झाडे यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता झाली आहे. दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
वडवणी प्राथमिक आरोग्या केंद्राच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी उषा गिन्यानदेव बांगर यांनी १७ जानेवारी २०१४ रोजी रात्री १०-१५ वाजता वडवणी येथील विठ्ठल झाडे यांनी त्यांच्या शासकीय कामात अडथळा केला व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, अशा आशयाचंी फिर्याद १८ जानेवारी २०१४ रोजी दिली. त्यानंतर विठ्ठल झाडे यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल होऊन साक्ष पुराव्याअंती सदरील प्रकरणात झाडे यांच्या वतीने अॅड.पी.एस.उजगरे यांनी काम पाहिले. खरी परिस्थिती साक्ष पुराव्याअंती न्यायालयासमोर आणून विठ्ठल झाडेविरूद्ध खोटी फिर्याद व साक्ष दिली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात वडवणी येथील दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाचे न्या. के.के.चाफले यांनी विठ्ठल झाडे यांना निर्दोष मुक्त केले. खोटी फिर्याद व साक्ष दिल्याने फिर्यादी वैद्यकीय अधिकारी उषा बांगर व स्टाफ नर्स पार्वती रामभाऊ मस्के यांच्याविरूद्ध कलम १९३ नुसार न्यायालय आदेशानुसार न्यायालयातच गुन्हा नोंद झाला. झाडे यांच्या वतीने वतीने अॅड. टी.ए.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.पी.एस.उजगरे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.एस.ए.शेख, अॅड.जे.एस.उजगरे यांनी सहकार्य केले