शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तोतया अधिकाऱ्याला जालन्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:06 IST

दारूच्या व्यसनासाठी महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कुसळंब : 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विविध लोकांच्या मोबाईल स्कॅनरचा वापर करून महिलांकडून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला अंमळनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर (वय ३५, रा. नाळवंडी, ता. पाटोदा) असे या भामट्याचे नाव असून, दारूच्या व्यसनापोटी त्याने ही नामी शक्कल लढवल्याचे तपासात समोर आले आहे.

पाटोदा तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागात आरोपी पन्हाळकर हा स्वतःची ओळख 'समाजकल्याण विभागाचा जाधव साहेब' अशी करून देत असे. "तुम्हाला शिलाई मशीन, पिठाची गिरणी आणि भांड्यांचे किट मंजूर झाले आहे," अशी बतावणी करून तो ट्रान्सपोर्ट खर्चाच्या नावाखाली महिलांकडून अडीच हजार रुपये उकळत होता. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून तो स्वतःच्या खात्यात पैसे न घेता, हॉटेल, पान टपरी किंवा महा-ई-सेवा केंद्रांच्या स्कॅनरचा वापर करून पैसे मागून घेत असे.

अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळवंडी येथील कविता पवार आणि इतर चार महिलांना अशाच प्रकारे फसवून त्याने ९ हजार रुपये उकळले होते. किट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कविता पवार यांनी १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ, योगेश बहिरवाळ, दिलीप घोशीर, पूजा तिपटे आणि शीतल पवळ यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील तपासात पोउपनि चव्हाण व त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण मदत केली.

सिम कार्ड बदलून मोबाईल बंद-चालूगुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी २५ ते ३० मोबाईल क्रमांकांचे सीडीआर तपासले. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलून मोबाईल बंद-चालू करत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक होते. मात्र, तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी ९ मार्च रोजी जालना शहरातून त्याला ताब्यात घेतले.

दारूच्या नशेसाठी रचला कटआरोपी पन्हाळकर हा पाचवी नापास आहे. त्याला दारूचे तीव्र व्यसन असल्याने पैशांची गरज होती. बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर तो सहज महिलांच्या पतींना फोन लावायचा आणि "किट मंजूर झाले आहे, तातडीने पैसे पाठवा" असे सांगून हॉटेलच्याच स्कॅनरद्वारे पैसे उकळायचा.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake officer arrested for scamming women in 'Ladki Bahin' scheme.

Web Summary : A conman posing as a 'Ladki Bahin' scheme officer was arrested in Jalna. He defrauded women by promising benefits like sewing machines and demanding money for transport under false pretenses, collecting ₹9,000 from four victims. He is a fifth-grade dropout with a severe alcohol addiction.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड