शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 13:33 IST

आष्टी पोलीसांनी दोघांना घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

ठळक मुद्देमहिलेने एक दोन नव्हे तर तब्बल ८ जणांशी केला बनावट विवाह

- अविनाश कदमआष्टी : तरुणांसोबत बनावट विवाह करून चारआठ दिवस राहून पैसे उखळणा-या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत दि.९ रोजी विवाह करुन एका महिलेने २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी मागणी करताच तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना रंगेनाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला आहे.  प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे. 

तालुक्यातील शिराळ येथील एका युवकाने पोलीस ठाणे आष्टी येथे तक्रार दिली की, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचे एका महीले सोबत लग्न झाले असून आत्ता ती महीला पैश्याची मागणी करीत असून पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सदर तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचून कारवाई केली. यावेळी एक महीला व पुरुष यांनी तक्रारदार युवक याचेकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम ५० हजार रुपये शासकिय पंचासमक्ष स्विकारली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी सात ते आठ युवकांसोबत लग्न लावुन त्यांना खोटया तक्रारी धमक्या देवुन त्यांचे कडुन पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांचे जबाबा वरुन पोलीस ठाणे आष्टी गु.र.न 69/2021 कलम 384,388,389,420,34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुन अधिक तपास कामी पोलीस कोठडी कामी मा.न्यायालयात हजर करुन  अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक आर राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार,उपविभागीय पोलीस अधीकारी विजय लगारे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोउपनि प्रमोद काळे, सफौ अरुण कांबळे ,पोह बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पोशि प्रदिप पिंपळे,सचिन कोळेकर , स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले,रियाज पठाण यांनी केली 

लग्नाचे आमिष दाखवणा-या टोळीला बळी पडू नये वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून ही टोळी आमच्याकडे मुलगी आहे.असे सांगून स्थळ दाखवले जाते व लग्नासाठी पैशाची मागणी करुन वारंवार खंडणी वसूल केली जाते या टोळीपासून तरुणांनी सावध रहावे व अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा - सलिम चाऊस, पोलिस निरीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड