खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:01 IST2020-08-20T18:59:42+5:302020-08-20T19:01:59+5:30
अँटिजन तपासणीत आला पॉझिटिव्ह अहवाल

खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांना व पोलिसांच्या वाहनावरील एक खाजगी चालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी माजलगाव येथे करण्यात आलेल्या अँटिजन तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी दिंद्रुडमध्ये एक रुग्ण आढळेला होता, त्यानंतर एकाचवेळी चार रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या दरम्यान अँटिजन टेस्ट मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहेत. गुरुवारी माजलगाव येथे तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अँटिजन तपासणी करण्यात आल्या. यात दिंद्रुड पोलीस स्थानकातील ३३ पैक्की १४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी तीन पोलिस कर्मचारी व पोलीसांच्या वाहनावरील एक खाजगी चालक यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. इतर १० कर्मचारी निगेटिव्ह आढळून आले. पॉझिटीव्ह रुग्णांवर माजलगाव येथिल कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर दोघांना होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या उर्वरित १९ कर्मचाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे.