खळबळजनक ! पोखरी परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 14:49 IST2021-10-18T14:48:08+5:302021-10-18T14:49:09+5:30
मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख ही पटलेली नाही

खळबळजनक ! पोखरी परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
आष्टी : बीड - अहमदनगर महामार्गावर पोखरी गावानजीक रोडच्या कडेला आज सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून आष्टी पोलिसांनी मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयात रवानगी केली आहे.
आष्टी तालुक्यातील पोखरी गावाच्या पूर्वेस रात्रीच्या वेळी वर्दळ नसते. जवळपास ग्रामस्थांचा रहिवास नसल्याने रात्रीच्या वेळी कोणीच तिकडे फिरकत नाही. मात्र, महामार्ग असल्याने रोडवर मोठ्या प्रमाणावर दळणवळण असते. आज सकाळी या ठिकाणी अंदाजे ४० ते ४२ वर्षीय तरुण अत्यवस्थ अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पो.ह. एस. ए. क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणास ग्रामीण रुग्णालयात हलवला. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख ही पटलेली नाही.
अंगावर पांढरा शर्ट, निळी जिन्स पॅन्ट, पायामध्ये काळा केशरी बुट सडपातळ असा बांधा आहे. याबाबत माहिती असल्यास आष्टी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.
- पो.ह.संतोष क्षीरसागर