तीन दिवस सुटीनंतरही परिवहन कार्यालयाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST2021-08-18T04:40:23+5:302021-08-18T04:40:23+5:30

मागील कित्येक वर्षे अधिकारी नसल्याने त्रस्त वाहनमालकांना सध्या दोन अधिकारी असतानादेखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ...

Even after a three-day holiday, the work of the transport office came to a standstill | तीन दिवस सुटीनंतरही परिवहन कार्यालयाचे काम ठप्प

तीन दिवस सुटीनंतरही परिवहन कार्यालयाचे काम ठप्प

मागील कित्येक वर्षे अधिकारी नसल्याने त्रस्त वाहनमालकांना सध्या दोन अधिकारी असतानादेखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जयवंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संदीप खडसे बीड कार्यालयात रूजू झाले; परंतु दोन्ही अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने वाहनमालकांना व चालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयात सर्व कामकाज हे संगणकाद्वारे होते. प्रत्येक कामकाजाला इंटरनेट लागतो; परंतु या कार्यालयात नेहमीच इंटरनेट बंद असते. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार करण्यासाठी अधिकारी कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. या सर्व बाबींची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच कार्यालयाचे कामकाज सुरळीत राहील, अशी उपाययोजना करावी, अशी मागणी ॲड. बक्शु अमीर शेख यांनी केली आहे.

Web Title: Even after a three-day holiday, the work of the transport office came to a standstill