शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

मृत्यूनंतरही मातेच्या मिठीत लेकरू; दीड वर्षांच्या मुलीसह शिक्षिकेचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 12:31 IST

Mother-Daughter Death body found in Beed: वर्षभरापूर्वी महिलेच्या पतीचे कोरोनामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते.

ठळक मुद्देमातृप्रेम किती घट्ट असते याचा प्रत्ययएकाच चितेवर अंत्यसंस्कार

नांदूरघाट(ता.केज): दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. काेरोनामुळे ( Corona Virus ) पतीचे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती. माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. दरम्यान, मातृप्रेम किती घट्ट असते याचा प्रत्यय बाणेगावच्या (ता.केज) ग्रामस्थांना १६ रोजी आला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता... हे चित्र पाहून उपस्थितांना गहिवरुन आले. आशा सुंदर जाधवर (२२) व शांभवी सुंदर जाधवर (१८ महिने) अशी त्या माय-लेकीची नावे आहेत. ( The body of a teacher along with her one and a half year old daughter was found in a well )

आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या. १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता - खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचाही बुडुून मृत्यू झाला.

एकाच चितेवर अंत्यसंस्कारकेज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे, जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेतली. १६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. नातेवाईकांचे जवाब बाकी असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

पाच पंपाद्वारे उपसले पाणीआशा व शांभावी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले. यावेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक