हेल्थ केअर, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यापेक्षा ज्येष्ठांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:25+5:302021-03-10T04:33:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना लसीकरणाला हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सपेक्षाही ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह अधिक दिसत आहे. सर्वच ...

हेल्थ केअर, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यापेक्षा ज्येष्ठांमध्ये उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोना लसीकरणाला हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सपेक्षाही ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह अधिक दिसत आहे. सर्वच शासकीय लसीकरण केंद्रांवर हे नागरिक नोंदणीसाठी गर्दी करीत आहेत. मनात कसलाही गैरसमज न ठेवता लस टोचून घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ५ हजार १३० लाभार्थ्यांनी लस घेतली असून कोमॉर्बिड आजार असलेल्या ४९९ लोकांनीही लस घेतली आहे.
पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स तर आता तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. १ मार्चपासून ते आजपर्यंत ज्येष्ठांचा उत्साह अधिक असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्व मिळून २६ हजार ३२४ लाभार्थ्यांना लस टोचली आहे. हा आकडा ८ मार्चपर्यंतचा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिले. खासगी रूग्णालयात ओढा कमी असून शासकीय रुग्णालयात अधिक आहे.
सरकारी डॉक्टर, कर्मचारी दूरच?
जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर्स असलेल्या १६ हजार लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे. परंतु ८ मार्चपर्यंत ११ हजार ९९९ जणांनीच लस घेतली आहे. अद्यापही सरकारी डॉक्टर आणि कर्मचारी या लसीपासून दूर पळत आहेत. इतरांना आवाहन करून विश्वास देणारे डॉक्टरच लसीपासून दूर पळत असल्याने सामान्य नागरिक व फ्रंटलाईन वर्कर्सही लस घ्यायला आखडता हात दाखवित असून आतापर्यंत ८ हजार ६९६ फ्रंटलाईन वर्कर्सनेच लस घेतली.
मी लस घेतली, तुम्ही पण घ्या...
लस अतिशय सुरक्षित आहे. मी पण घेतली आणि मुलगा अमृतलाही घ्यायला लावली. सुरुवातीला मनात भीती होती, पण कसलाही त्रास झालेला नाही. सर्व ज्येष्ठांनी ही लस घ्यावी.
हिराबाई निळकंठराव डावकर, बीड
माझा मुलगा डॉक्टर आहे. त्याने विश्वास दिला. पहिल्याच दिवशी मी आणि पतीने लस घेतली. अद्याप आम्हांला कसलाही त्रास नाही. ज्येष्ठांनी मनातील गैरसमज काढून टाकून लस घ्यावी.
शकुंतला द्वारकादास कासट, बीड
६ फेब्रुवारी रोजी मी जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर लस घेतली. मनात आगोदरही भीती नव्हती आणि आताही नाही. मला कसलाच त्रास झाला नाही. स्वत:साठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ही लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आम्ही इतरांनाही आवाहन केले आणि करतो.
इंदुमती कालीदास पिंगळे, बीड
===Photopath===
090321\092_bed_5_09032021_14.jpeg~090321\092_bed_8_09032021_14.jpg~090321\092_bed_9_09032021_14.jpg
===Caption===
हिराबाई डावकर~इंदुमती पिंगळे~शकुंतला कासट